शिक्षक अभियोग्यता चाचणीचा अभ्यासक्रम २०२३ pdf | TAIT exam syllabus in marathi pdf 2023

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम २०२3 pdf | TAIT exam syllabus in marathi pdf 2023 | अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पुस्तके pdf


नमस्कार  भावी शिक्षक बंधुंनो  पूर्वी शिक्षक होणे खूप सोपे होते म्हणजे डीएड किंवा बीड ची पदवी घ्यायची आणि परीक्षा देऊन लगेच शिक्षक म्हणून रुजू कोणी शक्य होते परंतु २०१७ व त्यानंतर शिक्षक भरती निघाली आणि त्या भरतीसाठी अगोदर सीईटी (mahatet) पास होणे कंपल्सरी केली त्यातच भर म्हणून सीईटी पास विद्यार्थ्यांना परत शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजेच टेट (Tait) परीक्षा पास होणे गरजेचे आहे आणि त्यानंतरच त्यांच्या गुणाच्या आधारे तुमची सिलेक्शन होणार आहे अशी ही किचकट प्रक्रिया करून ठेवलेली आहे जेणेकरून कमीत कमी उमेदवार या परीक्षेला पात्र होतील आणि हुशार शिक्षकच रुजू होतील.

 तुम्हाला माहीतच आहे महा टीईटी [ Maha Tet ] परीक्षा दोन वेळेस द्द होऊ दोन वेळेस रद्द होऊन तिसऱ्या वेळेस शेवटी महाटीईटी परीक्षा 26 नोव्हेंबर 2021 रोजी झाली  महा टीईटी पास होणाऱ्या उमेदवारांसाठी परत परीक्षा होणार आहे ती म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा त्यालाच टी ए आय टी [ TAIT 2023 ] असेही म्हणतात.

Maha Tait परीक्षा कधी होणार 2023?

 सदर Maha Tait परीक्षा फेब्रुवारीमध्ये 2023 मध्ये घेण्याचे नियोजन असून त्याचे अधिकृत तारीख व वेळ लवकरच महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल.

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी मध्ये होणार असून त्यासाठी आपण सर्व या वर्षी म्हणजेच 2023 साठी महाटेट परीक्षेचा अभ्यासक्रम असेल तसेच तसेच सदर परीक्षेसाठी कोणते पुस्तक वापरावे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा आराखडा नेमका कसा असेल कोणत्या घटकासाठी किती गुण असतील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे चा अर्ज कोणत्या वेबसाईट वर भरावा व कसा भरावा ही सर्व माहिती आपण आज या लेखामध्ये वाचणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा


TAIT 2023 Teacher Aptitude and Intelligence Test Eligibility Criteria | MAHA-TAIT महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता पात्रता


इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक [ Maha Tet परीक्षा पास ] पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली, १९८१ मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी करिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेस पात्र असतील.


MAHA-TAIT 2023 Age Criteria | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता वयोमर्यादा काय आहे 


शिक्षक सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करिता ३८ वर्ष व मागास सवर्ग उमेदवारा करिता ४३ वर्ष राहील.


MAHA-TAIT 2023 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी माहिती मराठी मध्ये -

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची असून सदरील चाचणी ही मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषा माध्यमात उपलब्ध असेल. सदरील परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. सर्व साधारणपणे परीक्षेचा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम व गुणभार आपणास पुढीलप्रमाणे पाहता येईल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम २०२३ pdf | TAIT exam syllabus in marathi pdf 2022 

Maha TAIT exam 2022-2023 syllabus pdf


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेचा आराखडा व अभ्यासक्रम खालील प्रमाणे.

पेपर साठी २  घटक असतात अभियोग्यता व बुद्धिमता व परिक्षा  ही एकून २०० प्रश्नांची व २०० गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल.


अभियोग्यता - 120 प्रश्न - 60% प्रश्न

बुद्धिमत्ता - 80 प्रश्न - 40 % प्रश्न

एकूण गुण - 200 

वेळ - 2 तास


🆕 Maha Tait 2022 प्रश्नपत्रिका एकूण 20 प्रश्नपत्रिका pdf


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा ६०% म्हणजेच १२० प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा ४०% म्हणजेच ८० प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

शिक्षक "अभियोग्यता" या घटकामध्ये अभ्यासक्रम 2022 - 2023 | TAIT exam syllabus in Marathi English PDF

 1. गणितीय क्षमता, 
 2. तर्क क्षमता, 
 3. वेग आणि अचूकता, 
 4. इंग्रजी भाषिक क्षमता, 
 5. मराठी भाषिक क्षमता, 
 6. अवकाशीय क्षमता, 
 7. कल/आवड, 
 8. समायोजन/ व्यक्तिमत्व 

इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल.

बुद्धिमत्ता या घटकामध्ये अभ्यासक्रम 2022 - 2023 | Maha TAIT exam syllabus in Marathi English pdf

 1. आकलन, 
 2. वर्गीकरण, 
 3. सांकेतिक भाषा, 
 4. लयबध्द मांडणी, 
 5. समसंबंध, 
 6. कुट प्रश्न, 
 7. क्रम-श्रेणी, 
 8. तर्क व अनुमान 

इत्यादी उपघटकांचा सर्वसाधारणपणे समावेश करण्यात येईल


Tait 2022 बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे 

 • वरील दोन घटकावर ही चाचणी असते.
 • विषय ज्ञानावर ही चाचणी घेतली जात नाही
 • परीक्षा ऑनलाईन (महापरिक्षा पोर्टल मार्फत)
 • वेळ - 2 तास
 • प्रश्न स्वरूप वस्तुनिष्ठ
 • परीक्षा विषय ज्ञानावर नाही त्यामुळे विशिष्ट स्तर मर्यादा नसते.
 • परीक्षा विषय ज्ञानावर नाही त्यामुळे विशिष्ट स्तर मर्यादा नसते.
 • राज्यशासन अभ्यासक्रम वेळोवेळो बदल करू शकते.
 • एका उमेदवारास जास्तीत जास्त 5 वेळा चाचणी देता येते.
 • >गुणात 5 वेळा परीक्षा देऊन सुधारणा करता येईल.


TAIT exam syllabus in Marathi English PDF | शिक्षक अभियोग्यता चाचणी अभ्यासक्रम pdf मध्ये


Download PDFशिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पुस्तके pdf २०२३| TAIT exam books in marathi pdf 2023


सध्या विद्यार्थीमित्रांमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षेच्या संदर्भ पुस्तकांविषयी खूप गोंधळ होत आहे. नक्की कोणते पुस्तक वाचावे. कोणते वाचू नये या बाबतीत संभ्रम आहे. सध्या उपलब्ध पुस्तकांमधून जास्तीत जास्त अचूक आणि परिक्षाभिमुख संदर्भ पुस्तकांची यादी देण्यात आलेली आहे.


शिक्षक अभियोग्यता चाचणी साठी उपयुक्त पुस्तके कोणती वापरावी : 

यामधील अभियोग्यता घटकांतर्गत खालील विविध उपघटक आहेत, त्यासाठी उपयुक्त पुस्तक सूची देत आहे.

1) गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता या घटकांच्या तयारीसाठी

 • 5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची पुस्तके
 • कोणतेही अंकागणिताचे 
 • (उदा: पंढरीनाथ राणे, मोकलीकर, सतीश वसे इ) बुक वापरू शकता. 
 • कोकिळा प्रकाशन चे पुस्तके
 • आर. एस. अगरवाल चे पुस्तके

2 ) मराठी व्याकरण - 

 • बाळासाहेब शिंदे चे पुस्तके वापरा

3) इंग्रजी साठी- 

बाळासाहेब शिंदे व रामदास वाघ यांची पुस्तके वापरा

4) अवकाशीय क्षमता, कल / आवड, "समायोजन/व्यक्तिमत्व, इत्यादी -

 • यासाठी अजित कुमार लिखित बी पब्लिकेशन चे शिक्षक अभियोग्यता मार्गदर्शक सर्वात उत्तम राहील, या बुक मध्ये सर्वच घटक खूप छान प्रकारे कव्हर केलेले आहेत. शिवाय संभाव्य प्रश्नपत्रिकाही दिलेली आहे, त्यामुळे तुम्हास प्रश्नपत्रिका स्वरूप कसे आहे समजून घेण्यास मदत होईल.

5) बुद्धिमत्ता या अंतर्गत येणाऱ्या घटकांच्या तयारीसाठी खालील पुस्तके वापरावीत

 बुद्धिमत्ता- जी. किरण किंवा अनिल कुलकर्णी

बुद्धिमापन चाचणी - वा. ना. दांडेकर

तैसेच 5 वी व 8 वी स्कॉलरशिप ची बुक्स वापरणे अत्यावश्यक आहे.

दिलेली बुक लिस्ट जवळपास परिपूर्ण आहे, आपण राहिलेल्या दिवसात त्यातून संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करू शकता...

• परीक्षेसाठी बेस्ट लक...
Top Post Ad

Below Post Ad