राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) Excel शीट डाउनलोड करा

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) Excel शीट डाउनलोड करा


दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३ - PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. 

सर्वेक्षणाचे वेळापत्रक :-


१) दिनांक ०२/११/२०२३ सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेत उपस्थित राहणे व खालील पूर्वतयारी करणे.

२) आवश्यकता असेल तर नमुना तुकडी व नमुना विद्यार्थी निवड करणे व त्याना ID क्रमांक देणे.

३) विद्यार्थी बैठक व्यवस्था पडताळणी व पूर्वतयारी करणे. (हवेशीर व विद्यार्थ्यांना योग्य उंची नुसार बेंच, व इतर सुविधा)

४) हजेरी पत्रकातील नोंदी यांची प्रत मिळविणे, TQ प्रश्नावली साठी शिक्षक निश्चिती करणे. दिनांक ०३/११/२०२३

खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा स्तरावर क्षेत्रीय अन्वेषकांमार्फत कार्यवाही करावी.
💥 SEAS सराव प्रश्नपत्रिका pdf डाउनलोड करा


• सर्वेक्षण साहित्य वितरण :


१) सर्वेक्षण साहित्याचे वितरण दिनांक २६/११/२०२३ पासून सुरू होत आहे. जिल्हास्तरावर इयत्ता निहाय व शाळा संख्यानुसार (या पत्रासोबत देण्यात आलेल्या जिल्हानिहाय / तालुकानिहाय / शाळानिहाय) शाळांचे गड्ढे ताब्यात घेण्यात यावेत. इयत्ता तिसरी, इयत्ता सहावी आणि इयत्ता नववी असा इयत्तांचा प्रत्येकी एक गठ्ठा करण्यात आलेला आहे. त्याचे विवरण या पत्रासोबत देण्यात येत आहे. 
२) तसेच जिल्ह्यांना पुरविण्यात आलेल्या गठ्यांमध्ये इयत्तानिहाय सर्वं बुकलेट्स (प्रश्नपत्रिका ), PQ प्रश्नावली, SQ प्रश्नावली व TQ प्रश्नावली एकत्रच आहेत तसेच याच गठ्यांमध्ये बुकलेटच्या (प्रश्नपत्रिकाच्या ) ३५ OMR, PQ घ्या ३० OMR, SQ च्या ०२ OMR TQ ची ०१ OMR आहेत. तसेच सर्वेक्षणानंतर साहित्य संकलन करणेसाठी ०२ रिकामे पाकिटे देण्यात आले आहेत.

३) साहित्य संकलनासाठी जी दोन रिकामी पाकिटे देण्यात आलेली आहेत त्यामध्ये सर्वेक्षणानंतर संकलन करावयाच्या साहित्याचा तपशील की जो जिल्हास्तरावर जमा करण्यात येणार आहे:-

FI साठी सर्वसाधारण सूचना -


रिकाम्या पॉकेटमध्ये पॉकेट क्रमांक ०१ मध्ये भरलेल्या (Used) OMR म्हणजेच बुकलेटच्या (प्रश्नपत्रिका) AT OMR घालाव्यात.

पॉकेट क्रमांक ०२ मध्ये PQ, SQ च TQ च्या भरलेल्या OMR तसेच फिल्ड नोट (Field Note घालाव्यात > तसेच न वापरलेल्या OMR प्रश्नावल्या (PQ, SQ व TQ) BOOKLET व वापरलेल्या booklet व खराब OMR इत्यादी सर्व सर्वेक्षण साहित्य एका गठ्ठयात बांधाव्यात व त्याही जमा कराव्यात.

तालुका समन्वयक यांनी OMR मोजून घ्याव्यात व पाकिटे सीलबंद करून जिल्हा समन्वयक यांच्याकडे जमा करावीत जिल्हा समन्वयकांनी सर्व तालुक्यांची साहित्य एकत्र करून फक्त OMR चे भरलेली पॉकेट फक्त स्कॅनिंग साठी आपणाला विभाग स्तरावर (खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे) ज्या डायटला ही जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्याकडे ही पाकिटे दि. ०४/११/२०२३ अखेर दुपारी ३.३० वाजता जमा करावीत. त्याचे नियोजन खालीलप्रमाणे असेल.


उपस्थिती: संदर्भ क्र. ७ नुसार दिलेल्या निर्देशानुसार


१. सर्वेक्षण कालावधीत सर्व शाळामधील विद्यार्थी १००% उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी.

२. ज्या शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी आहे अशा शाळांमध्ये ज्या वर्गाची परीक्षा आहे त्या वर्गाला त्या दिवशी उपस्थित ठेवण्यासाठी सांगावे.

शाळा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील निवड झालेल्या इयत्तेला सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या दिलेल्या वेळेतच उपस्थित राहण्याबाबत निर्देश देण्यात यावेत.

सदर सर्वेक्षण संदर्भात जिल्हानिहाय संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोणातून केलेली कार्यवाही व जिल्ह्याची प्राप्त संपादणूक विचारात घेऊन सर्व जिल्हास्तरीय समन्वयक व जिल्हास्तरीय सहायक समन्वयक तसेच तालुका समन्वयक, राज्यस्तरावरील संपर्क समिती सदस्य, पर्यवेक्षीय यंत्रणा व शिक्षक यांचे गोपनीय अहवाल भरताना याची नोंद घ्यावी.💥 संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील. Download वर क्लिक करा.

Download💥 राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) साठी लागणारी उपस्थिती Excel शीट व PROCEDURE FOR THE SELECTION OF A SECTION डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा


✡️ हे पण वाचा ⤵️ 

🆕  MDM Excel सॉफ्टवेअर कसे वावरावे वाचा

 🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2023-24 pdf

🆕 संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका 1 ली ते 9 वी 2023-24 pdf

🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2023

🆕  इ 9 वी 10 वी जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021
🆕  9 th Result Software for 2021-22 download
🆕  इ 10 वी विज्ञान प्रयोगवही सोडवलेली pdf डाउनलोड करा
🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !Top Post Ad

Below Post Ad