11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्रश्न व उत्तरे | 11th Admission Question Answer 2024

11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्रश्न व उत्तरे  2024| 11th Admission Question Answer 2024


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावी ऑनलाइन प्रवेश ( 11th admission process )  प्रक्रिया 2024 25 ची सुरू झाली असून बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच सारे प्रश्न पडलेले आहेत परंतु सदर प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळालेली नाहीत 

या लेखांमध्ये इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिये संदर्भात पहिला राऊंड व दुसरा राउंड मधील प्रश्न तसेच पहिल्या राउंड नंतर आपली कॉलेज कसे निवडावे कॉलेजमध्ये कसा प्रवेश घ्यावा प्रवेश घ्यायचा नसेल तर काय करावे दुसऱ्या राउंडसाठी काय करावे असे अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मिळणार आहे त्यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये मिळणार आहेत 

तुमचेही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा


💥 जॉईन व्हाट्सअप्प ग्रुप 

👉 Join whatsapp Group11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्रश्न व उत्तरे  2024| 11th Admission Question Answer 2024


💥 11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्रश्न व उत्तरे  | 11th Admission Question Answers


प्रश्न :- जनरल मेरिट लिस्ट म्हणजे काय ? What mean by General Meri list 2024 

उत्तर : मित्रांनो दि. 22 जून 2024 रोजी जनरल मिरीट लिस्ट लागलेली आहे , जनरल मिरी मिरीट लिस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत पार्ट टू मध्ये सहभाग घेतला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी म्हणजेच जनरल मेरिट लिस्ट.  या यादीवरून आपण आपले नाव बरोबर आहे का आपल्याला मिळालेले गुण तसेच आपण भरलेली माहिती बरोबर आहे का याची फक्त खात्री करण्यासाठी ही जनरल मेरिट लिस्ट असते . या लिस्टचा आणि अलॉटमेंट सिलेक्शन लिस्टचा काहीही संबंध नाही.


💥 ११ वी प्रवेशप्रक्रिया २०२३ मागील व या वर्षीच्या सर्व कॉलेजची कट ऑफ लिस्ट |


प्रश्न :- अलॉटमेंट लिस्ट / सेलेक्शन लिस्ट कधी लागणार आहे ? 11th Admission -  When allotment list will be declare ? 

उत्तर :  इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार दिनांक 27 जून 2024 रोजी अलॉटमेंट लिस्ट लागणार आहे याद्वारे आपल्या लॉगिन मध्ये किंवा आपल्या मोबाईलच्या मोबाईलवर एसएमएस येणार आहे त्याद्वारे आपण आपल्याला कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे किंवा नाही हे आपण चेक करू शकता


💥 11 वी प्रवेशप्रक्रिया पहिल्या फेरीमध्ये कुठले कॉलेज मिळाले कसे चेक करावे प्रश्न :- मला कोणते कॉलेज मिळाले कसे चेक करावे | how to check Allotted college ?

उत्तर :  आपल्याला कोणते कॉलेज मिळाले किंवा आपल्याला कॉलेज मिळाले किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपल्या लॉगिन आयडी मध्ये लॉगिन करायचे आहे लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला अलॉटमेंट लिस्ट ( Allotment List )  या टॅब वर क्लिक करायचे आहे त्यानंतर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये आपल्याला कुठली कॉलेज मिळाली आहे हे दिसणार आहे जर तिथे काही डिस्प्ले होत नसेल तर आपल्याला आपण दिलेल्या प्रेफरन्समधील एकाही कॉलेजमध्ये आपला नंबर लागलेला नाही असे समजावे व दुसऱ्या राउंड साठी प्रतीक्षा करावी
💥 प्रश्न :- मला मिळाल्या मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कसे करावे ( I don't want to get admission on that college what to do ?) 

उत्तर :  ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला अलॉटमेंट लिस्ट वर क्लिक करायचे आहे अलॉटमेंट लिस्ट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्याला कुठली कॉलेज मिळाले आहे ते चेक करायचे आहे त्यानंतर खालच्या बाजूला प्रोसीड टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करायचे आहे प्रोसेस टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक केल्यानंतर आपल्याला उर्वरित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जसे की एलसी मार्कशीट कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमी लेयर असे आणि त्यानंतर आपल्याला कॉलेज दिलेल्या कॉलेजमध्ये जाऊन आपले ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन ऍडमिशन करायचे आहे


प्रश्न :- मला लागलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसल्यास काय करावे ( how to cancel 11th alloted College admission )

उत्तर :  मित्रांनो तुम्हाला अलॉटमेंट झालेल्या कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचे नसेल तर तुम्हाला काहीही करायचे नाही (Proceed To Admission ) या टॅब वर क्लिक करायचे नाही. डायरेक्ट जेव्हा दुसरा राउंड सुरू होईल तेव्हा दुसऱ्या राउंड मध्ये आपली प्रेफरन्स चेंज करा . प्रत्येक कॉलेजच्या कट ऑफ किती आहे ते चेक करा त्यानुसारच सेकंड राउंड लॉक करा . परंतु लक्षात घ्या जर तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्सचे कॉलेज लागले असेल तर त्यामध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतले नाही तर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येत नाही हे लक्षात ठेवा
💥 प्रश्न :- उर्वरित डॉक्युमेंट कसे अपलोड करावे

उत्तर :  डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या लॉगिन आयडी ने लॉगिन करायचे आहे व अपलोड डॉक्युमेंट या टॅब वर क्लिक करायचे आहे आपण या टॅबमधून उर्वरित सर्व डॉक्युमेंट अपलोड करू शकतो


प्रश्न :- फर्स्ट प्रेफरन्स दिलेले कॉलेज अलॉट झालेली आहे परंतु मला तिथे ऍडमिशन घ्यायचे नाही काय करावे

उत्तर :  मित्रांनो लक्षात ठेवा जर फर्स्ट प्रेफरन्स चे कॉलेज जर आपल्याला मिळाले तर आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचेच आहे ! जर आपण त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले नाही तर आपण पुढच्या फेरीमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत परंतु जर दुसरा प्रेफरन् किंवा त्या पुढील प्रेफरन्सचे कॉलेज जर आपल्याला मिळाले असेल आणि ते जर आपल्याला नको असेल तर आपल्याला काही करायची गरज नाही.  प्रोसेस टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करायचे नाही जेव्हा सेकंड राउंड सुरू होईल तेव्हा आपण आपले प्रेफरन्स परत अदलाबदल करून लॉक करू शकता व दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेऊ शकता


प्रश्न :- दुसरा राउंड कधी सुरू होणार आहे ( when  11th admission second round started )

उत्तर :   दुसरा राउंड अंदाजी 03 जुलै 2024 पासून सुरू होईल त्यानंतरच आपण दुसऱ्या राउंड साठी अप्लाय करू शकता
💥 प्रश्न :- दुसऱ्या राउंड मध्ये मला परत रजिस्ट्रेशन करावे लागेल का किंवा परत पार्ट 1 , पार्ट टू भरावा लागेल का  ? ( May apply 11th admission process even I don't register before ) 

उत्तर :  दुसऱ्या राउंड मध्ये आपल्याला जर आपल्याला काही बदल करायचा असेल तरच आपण तो बदल करावा नाहीतर फक्त आपले प्रेफरन्स कॉलेजच्या कट ऑफ नुसार मागेपुढे करून प्रेफरन्स लॉक करावे दुसरे काहीही करायची गरज नाही


प्रश्न :- पहिल्या राऊंडची कट ऑफ कशी चेक करावी ? How to check cut off list 11th admission 2024 

उत्तर :  मित्रांनो पहिला राऊंड झाल्यानंतर पूर्ण डिव्हिजनची कट ऑफ लिस्ट कॉलेजनीहाय येत असते अकरावी ऑनलाईन ऍडमिशनच्या होम पेजवर क्लिक करून आपण कट ऑफ लिस्ट डाउनलोड करून  चेक करू शकता


प्रश्न :- प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत कसे चेक करावे ? How to check vacancy list college's

उत्तर :  प्रत्येक कॉलेजच्या वेगवेगळ्या जागा असतात व सदर जागा ह्या कॅटेगिरी निहाय विभागून दिलेले असतात त्यामुळे प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत हे सांगता येणार नाही परंतु पहिल्या राउंड मध्ये जेवढ्या जागा असतात त्यापेक्षा कमी जागा दुसऱ्या राउंड मध्ये असतात . सदर कॉलेजमध्ये शिल्लक असतात त्यामुळे दुसऱ्या राउंड मध्ये अप्लाय करण्यापूर्वी प्रत्येक कॉलेजची कट ऑफ किती लागलेली आहे हे चेक करूनच दुसऱ्या राउंड मध्ये कॉलेज निवडावे


प्रश्न :- मी पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतला नव्हता किंवा आम्ही रजिस्ट्रेशनही केली नव्हते तर मला आता सहभाग घेता येईल का? 

उत्तर :  होय तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे तुम्ही प्रथम रजिस्ट्रेशन करून पाठवण आणि पार्ट टू भरू शकता
💥 प्रश्न :- दुसऱ्या राउंड मध्ये मी माझी स्ट्रीम किंवा इतर माहिती बदलू शकतो का ? ( Can I change my stream in second round )

उत्तर :  होय दुसऱ्या राउंड मध्ये आपल्याला हवा तो बदल करता येतो सुरुवातीला फॉर्म अनलॉक करून आपण आपली स्ट्रीम बदल करू शकता व सेकंड राउंड साठी आपण अप्लाय करू शकता


प्रश्न :- पहिल्या राउंड मध्ये माझं सिलेक्शन झाले आहे मला कॉलेज मिळाले आहे तर मी दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेऊ शकतो का ?

उत्तर :  पहिल्या राउंड मध्ये जर आपल्याला कॉलेज मिळाले असेल तर आपण त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे किंवा त्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचे नसेल तर कृषी टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करू नका आपल्याला दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेता येईल


प्रश्न :- दुसऱ्या राउंड साठी कॉलेज कसे निवडावे ? ( How to apply second round how to select college )

उत्तर :  मित्रांनो अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईटवर प्रत्येक कॉलेजची कट ऑफ दिलेली आहे प्रत्येक कॉलेजची कट ऑफ किती लागलेली आहे ते चेक करावे आणि आपल्याला किती गुण मिळालेले आहेत हे चेक करावे जर यामध्ये जास्त अंतर असेल तर आपण सदर कॉलेजचे नाव न देता ज्या कॉलेजची कटऑफ कमी लागलेली आहे किंवा आपल्या गुणांच्या जवळपास लागलेली आहे त्या कॉलेजमध्ये आपण भाग घ्यावा


Top Post Ad

Below Post Ad