🎯 11 वी दुसऱ्या (2nd) फेरी चे वेळापत्रक जाहीर ! 11th Admission 2nd Round Timetable Declared 2024 !

🎯 11 वी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या (2nd) राऊंड चे वेळापत्रक जाहीर ! 11th Admission 2nd Round Timetable Declared 2024 !


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2024 पहिल्या राऊंड चा निकाल लागला असून बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेले आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा नंबर लागला नसून किंवा बऱ्याच जणांनी पसंतीचे कॉलेज मिळालेले नसून त्यांना सेकंड राउंड साठी अप्लाय करायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या राउंड चे वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थी दिनांक 3 जुलै 2024 पासून सेकंड राउंड साठी अप्लाय करू शकता आपले प्रेफरन्स भरू शकता !
🎯 11 वी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या (2nd) राऊंड चे वेळापत्रक जाहीर ! 11th Admission 2nd Round Timetable Declared 2024 !
🎯 11 वी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या (2nd) राऊंड चे वेळापत्रक जाहीर ! 2nd Round Timetable Declared !


🔸 प्रेफरन्स भरायला सुरुवात - 03 जुलै  ते 06 जुलै 2024 !

🔹 दुसऱ्या राउंड चा निकाल - 10 जुलै 2024 !

🔹 दुसऱ्या राउंड ची कट ऑफ  - 10 जुलै 2024 !

🔸 कॉलेज ऍडमिशन - 10 जुलै ते 12 जुलै 2024!


💥 दुसऱ्या फेरीसाठी काही महत्वाच्या सूचना !

  1. पहिल्या फेरीमध्ये ज्यांचा नंबर लागलेला नाही सदर विद्यार्थी दुसऱ्या राउंड साठी अप्लाय करू शकतात 
  2. ज्या विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज मिळालेले नाही व ज्यांनी ऍडमिशन घेतलेले नाही अशा विद्यार्थी सुद्धा सेकंड राउंड साठी अप्लाय करू शकतात 
  3. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये भाग घेतला नव्हता तसेच ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केले नव्हते असे सुद्धा विद्यार्थी सेकंड राउंड साठी आपले रजिस्ट्रेशन पार्ट 1 व पार्ट 2 भरू शकतात
  4. दुसऱ्या राउंड साठी आपल्याला आपले पसंतीक्रम बदल करायचे असल्यास ते बदलही करू शकता किंवा तसेच ठेवायचे असल्यास तसेच ठेवू शकतात 
  5. परंतु लक्षात ठेवा पसंतीक्रम दिल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म लॉक करायचा आहे अन्यथा आपण सेकंड राउंड साठी आपला फॉर्म ग्राह्य धरला जाणार नाही,  त्यामुळे आपला फॉर्म आठवणीने लॉक करा
  6. ज्या विद्यार्थ्यांना आपली स्ट्रीम बदलायची असेल, आपला कोटा ऍडमिशन बदलायचे असेल, कॅटेगिरी बदलायचे असेल, काही दुरुस्ती करायचे असतील तर सेकंड राउंड मध्ये आपण त्या दुरुस्ती करू शकता दुरुस्ती केल्यानंतर आपला फॉर्म व्हेरिफाइड असला पाहिजे तरच आपण दुसऱ्या राउंडसाठी पार्ट टू भरू शकतात
  7. दुसऱ्या राउंड मध्ये आपण कोटा ऍडमिशन साठी सुद्धा फॉर्म भरू शकता  ज्या विद्यार्थ्यांनी कोटा ऍडमिशन मधून पहिला राऊंड साठी अर्ज केले होते परंतु त्यांचा नंबर लागलेला नव्हता असे विद्यार्थी दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा कोटा ऍडमिशन साठी अर्ज करू शकतात


💥 दुसऱ्या फेरीसाठी कोण अप्लाय करू शकत नाही ? 

  1.  ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या पसंतीचा कॉलेज लागलेला आणि त्या कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही अशा विद्यार्थ्यांना सेकंड राउंड मध्ये भाग घेता येणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचा पसंती क्रम दुसरा तिसरा व यापुढे असतील व त्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली नसेल तर ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेऊ शकतात.
  2. ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आहे व काही कारणास्तव ऍडमिशन कॅन्सल केले असल्यास अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेता येणार नाही वरील दोन्ही विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू शकणार नाहीत परंतु सदर विद्यार्थी तिसऱ्या फेरीमध्ये अप्लाय करू शकतात

💥 ऑफिशियल वेळापत्रक डाउनलोड करा 

Download PDF

Top Post Ad

Below Post Ad