११ वी दुसऱ्या राउंड साठी अप्लाय कसा करावा | 11th Admission 2nd Round form filling 2024
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या राउंड चे वेळापत्रक जाहीर झाले असून 3 जुलै ते 6 जुलै 2024 पर्यंत आपल्याला आपला अर्ज करायचा आहे . दुसऱ्या राउंड मध्ये आपल्याला अप्लाय करायचे असेल तर कशाप्रकारे अप्लाय करायचे आहे , आपला फॉर्म कसा अनलॉक करायचा आहे, प्रेफरन्स कसे चेंज करायचे किंवा डिलीट करायचे , तसेच आपला फॉर्म परत लॉक कसा करावा , याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत !
💥 विद्यार्थी मित्रांनो सेकंड राउंड मध्ये अप्लाय करण्यापूर्वी दुसऱ्या राउंड साठी प्रत्येक कॉलेजची वेकन्सी किती आहे व प्रत्येक कॉलेजची कट ऑफ किती आहे हे चेक करावे वेकन्सी शीट डाऊनलोड करण्यासाठी होम पेजवर वेकेन्सी फॉर सेकंड राउंड टॅब वर क्लिक करून वेकेन्सी लिस्ट डाऊनलोड करा आपल्याला हव्या त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्या कॉलेजची वेकन्सी किती आहे चेक करावे तसेच सदर कॉलेजची कट ऑफ किती आहे चेक करावे कट ऑफ लिस्ट प्रत्येक कॉलेजची सुद्धा आपण डाऊनलोड करून चेक करावे व शेवटी आपल्याला मिळालेले गुण किती आहे याचा अंदाज घेऊनच दुसऱ्या राउंड मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स द्यावे
पहिल्या राउंड ची कट ऑफ आणि कॉलेज ची रिक्त जागा डाउनलोड करा
💥 लक्षात ठेवा -
ज्या विद्यार्थ्यांचा पहिला राऊंडमध्ये नंबर लागला नाही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांन विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे परंतु पसंतीचे कॉलेज मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राउंड मध्ये भाग घ्यायचा आहे फक्त लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्सचे कॉलेज मिळालेली आहे त्यांना त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावेच लागेल अन्यथा दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेता येणार नाही ते विद्यार्थी डायरेक्ट तिसरा राउंड मध्ये भाग घेऊ शकता
💥 ११ वी दुसऱ्या राउंड साठी अप्लाय कसा करावा | 11th Admission 2nd Round form filling 2024
दुसऱ्या राउंड मध्ये भाग घेण्यासाठी प्रथम आपल्या अटी आणि पासवर्ड लॉगिन करायचे आहे
लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म अनलॉक करायचा आहे फॉर्म अनलॉक करण्यासाठी डाव्या बाजूला अनलॉक फॉर्म या टॅब वर क्लिक करून आपला फॉर्म अनलॉक करावा
💥 फॉर्म अनलॉक केल्यानंतर आपल्याला आपला आपली स्ट्रीम बदलायची असेल तर आपली स्टीम बदलू शकता किंवा डायरेक्ट आपण प्रेफरन्स या टॅब मध्ये जाऊन आपली प्रेफरन्स बदल करू शकता लक्षात घ्या ज्यांना प्रेफरन्स बदलायचे नसते त्यांनी फॉर्म अनलॉक करायची गरज नाही
जर आपल्याला आपला नंबर लागलेला आहे ते कॉलेज डिलीट करायचे असेल तर आपल्याला प्रेफरन्स या टॅब वर जाऊन सदर कॉलेज करून खालील डिलीट बटन वर क्लिक करायचे आहे
कॉलेजची प्रेफरन्स चेंज करायचे असल्यास सेट प्रेफरन्स या टॅब वर क्लिक करून आपण आपले दिलेली हवे ते कॉलेज सर्च करू शकता कॉलेज सर्च करण्यासाठी सिलेक्ट जुनियर कॉलेज या टॅब वर क्लिक करून आपल्या विभागातील कॉलेज सर्च करावे व खाली दिलेल्या कॉलेजच्या टॅब वर क्लिक करावे
सर्व कॉलेज ऍड केल्यानंतर प्रत्येक कॉलेजची प्रेफरन्स आपल्याला सेट करायचे आहे प्रेफरन्स सेट करण्यासाठी आपल्याला जो प्रेफरन्स एक नंबरला द्यायचा आहे ते कॉलेज अगोदर निवडायचे आहे अशाप्रकारे सर्व कॉलेजला प्रेफरन्स द्यायचे आहे
प्रेफरन्स दिल्यानंतर आपण आपला फॉर्म लॉक करायचा आहे लक्षात ठेवा जर आपण आपला फॉर्म ब्लॉक केला नाही तर आपण सेकंड राउंड साठी अँप्लिकेबल नसणार आहात