RTE 25% रजिस्ट्रेशन 2024 सुरू झाले | RTE admission 2024-25 Registration Date maharashtra

RTE 25% रजिस्ट्रेशन 2024 सुरू झाले | RTE admission 2024-25 Registration last Date maharashtra


RTE admission 2024-25 Registration Date maharashtra


नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ( RTE Registration Date 2024 ) तारीख ठरली असून, १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज विद्यार्थी व पालकांना आपल्या पाल्याचे रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

जॉईन व्हाट्सअप्प ग्रुप 

Click Here(link)


Download GR



💥

RTE Registration Date 2024 25


Rte 25% 2024-25 Registration Date maharashtra

वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी शिक्षण हक्क कायदा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ अन्वये कलम १२ (एफ) (सी) नुसार व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांना नोंदणी बंधनकारक होती. त्यानुसार आरटीई पात्र शाळांनी नोंदणी केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याबाबतचे पत्र सोमवारीच जारी केले असून, त्यानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे रजिस्ट्रेशन दिनांक १६ एप्रिलपासून आरटीई अंतर्गत  शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे..

 दरवर्षी प्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. तरी याबाबत व्यापकस्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी.


💥 आरटीई २५ टक्के २०२४ -२५ ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना

💥 RTE प्रवेश 2024 25 आवश्यक कागदपत्रे pdf

💥 RTE प्रवेश 2024 25 वयोमर्यादा (rte admission 2024 Age limit)


Top Post Ad

Below Post Ad